महाराष्ट्राला संत विचार आणि शिव विचारांची अनमोल अशी परंपरा लाभलेली आहे- शिवव्याख्याते ज्ञानेश्वर कवाद

0

पारनेर: तालुक्यतील निघोज येथील श्री. मुलीका देवी महाविद्यालय येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, श्री. मुलिकादेवी महाविद्यालय निघोज येथे इतिहास विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिवव्याख्याते श्री ज्ञानेश्वर कवाद सर व शिवव्याख्याते जितेश सरडे हे उपस्थित होते. या वेळी शिवव्याख्याता ज्ञानेश्वर कवाद यांनी शिवचरित्राची महती सांगताना महाराष्ट्राला संत विचार आणि शिव विचारांची अनमोल अशी परंपरा लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातिभेद, धर्मभेद, वंशभेद यांची शृंखला तोडून टाकत मानवतावादी मूल्य समाजात प्रसृत केली आहेत. असे प्रतिपादन केले. 

तर शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन करून एक प्रकारे धर्मसहिष्णू हिंदुत्वाचा साक्षात्कार घडविला आणि मध्ययुगीन महाराष्ट्रात स्वराज्याच्या रूपाने एक तेजोमय क्रांती घडवून आणली. शिवरायांच्या विचारांचा वारसा हे महाराष्ट्राचे भाग्य आहे असे मत शिवव्याख्याता जितेश सरडे यांनी व्यक्त केले

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. आहेर सर यांनी शिवचरित्र मानवाला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविते. मध्ययुगीन कालखंडात समाजाची सुस्थित घडी बसवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक प्रकारे सामाजिक अभियंताच होते असे मत व्यक्त केले. 

 या कार्यक्रमाप्रसंगी प्र. प्राचार्य डॉ. मनोहर एरंडे, प्रा. अशोक कवडे, प्रा. अंजली मेहेर, प्रा. दिपाली जगदाळे, प्रा. आनंद पाटेकर, प्रा. रामदास खोडदे, प्रा. अक्षय अडसूळ, प्रा. सोनाली काळे, प्रा. प्रतिभा शेळके, प्रा. सचिन निघुट, श्री. संदीप लंके, श्री. नवनाथ घोगरे, अक्षय घेमूड, श्री. सागर आतकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्रा. विशाल रोकडे, सूत्रसंचालन प्रा. संगीता मांडगे व आभार प्रदर्शन प्रा. मनीषा गाडीलकर यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top