पैलवानांचा आधारवड........कै.सदाशिव (अण्णा) पाचपुते

0

महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील एक दिग्गज एक नाव म्हणजे काष्टी गावचे सदाशिव अण्णा पाचपुते, अण्णांना मुळातच लहानपणापासून कुस्ती क्षेत्राची अत्यंत आवड होती. अण्णांचे मोठे बंधू माजी मंत्री आमदार श्री. बबनराव पाचपुते हे त्या काळाचे आघाडीचे मल्ल. त्यामुळे त्यांना कुस्ती विषयी खूपच आवड. कुस्ती हा खेळ म्हणजे गरीब घरातील मुलांचा आवडता खेळ, काष्टी गावात एक छोटी तालीम होती. अण्णांचा रोजचा नित्यक्रम म्हणजे रोज संध्याकाळी अण्णा तालमीत वेळात वेळ काढून गावातील मल्लांचा सराव पाहिला नक्की यायचे. तालमीत अनेक मल्ल राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडू होते. पण तालमीत अनेक सुविधांचा अभाव असल्याने त्यांनी २००१ या वर्षी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ कै. भिकाजीराव पाचपुते व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना करून सर्व सुविधायुक्त तीन मजली तालीम काष्टी येथे स्वतःच्या जागेत चालू केली. त्या तालमीमध्ये राज्यातील अनेक नामवंत मल्ल येऊन दीडशे  मल्ल तेथे सराव करू लागले. त्यांना रोज सकाळ-संध्याकाळ दूध व महिन्याला प्रत्येकाला पाच किलो तूप, फळे अण्णा पुरवत होते. सकाळी व सायंकाळी अण्णा स्वतः पैलवानांच्या सरावासाठी तेथे उपस्थित राहत होते. महाराष्ट्रातील असा एकही पैलवान असा नाही की त्याला सदाशिव आण्णा हे नाव माहिती नाही. महाराष्ट्रातील कुस्ती निवेदक कायम म्हणत असतात, पैलवानांचा एकच आश्रयदाता आहे तो म्हणजे "सदाशिव आण्णा". राज्यातून कोणताही पैलवान आला की आण्णा त्याची मदत केल्याशिवाय त्याला माघारी पाठवत नसत. तालुक्यातील प्रत्येक गावातील यात्रेच्या आखाडाला अण्णांची उपस्थिती हा सर्वांना माहीत असलेला विषयच आहे. मल्ल आपल्या तालमीतला असो वा दुसऱ्या त्याला स्वतःच्या खिशातून पारितोषिक देणे हा त्यांचा स्वभाव होता. २००७ या वर्षी अण्णांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे एक कुस्ती मैदान काष्टी येथे घेऊन एक इतिहास घडवला होता. प्रत्येक पैलवान वर आपल्या मुला एवढी माया लावून प्रत्येकाच्या सुख-दुःखात कायम बरोबर राहून कोणत्याही अडचणीच्या काळात "मी आहे" हा शब्द असायचा...... अण्णांचे दि.१९/२/२०२१ रोजी दुःखद निधन झाले.अश्या या आमच्या मार्गदर्शक,आधारवड...

अण्णांना महाराष्ट्रातील सर्व पहिलवानांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.                        

शब्दांकन,लेखन - पै.प्रा.रोहन (बंटी) रंधवे, (शिवराय केसरी)काष्टी



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top