श्री.मुलिकादेवी महाविद्यालयात शेखर लंकेचा सन्मान.

0

पारनेर-  तालुक्यातील निघोज येथे श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय खेळाडू शेखर दत्तू लंके यांचा जिमखाना क्रिडा विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर होते.

शेखर लंके यांनी मागील महिन्यात नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय यूथ फेडरेशनच्या वतीने मैदानी स्पर्धेत भारताच्या वतीने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत भारत भूटान व नेपाळ या देशातील अनेक गुणवंत खेळाडू सहभागी झाले होते. मैदानी स्पर्धेमध्ये शेखर लंके हा महाराष्ट्राच्या वतीने एकमेव खेळाडू होता. या स्पर्धेच्या अंतिम लढतींमध्ये शेखर बँकेच्या विरोधात नेपाळ येथील एक खेळाडू होता. परंतु शेखर लंके यांनी २०० मीटर धावणे या मैदानी स्पर्धेमध्ये २१ पॉईंट ७५ इतक्या वेळेत दोनशे मीटरचे अंतर कापून प्रथम क्रमांकाचे गोल्ड मेडल मिळवले व भारताचे नाव या स्पर्धेत सुवर्ण अक्षरात कोरले.

मी महाविद्यालय मैदानावर मागील ८ महिन्यापासून सराव केला त्याचे यश म्हणजे माझे गोल्ड मेडल आहे. मलेशिया येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय स्पर्धेची मी तयारी करत असून त्यातही मला यश मिळेल असा विश्वास आहे.- शेखर लंके

यावेळी डॉ. सहदेव आहेर यांनी शेखर लंके या गुणवंत खेळाडूनी निघोजचे नाव भारतात पोहोचवले आहे असे सांगितले. यावेळी डॉ. मनोहर एरंडे यांनी शेखर लंके यांना मलेशिया येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

हा कार्यक्रम क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडा विभागप्रमुख डॉ. पोपट पठारे यांनी केले. आभार प्रा. राम खोडदे यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रा. आनंद पाटेकर यांनी केले.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top