पारनेर : पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे ताई बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, मिठाई वाटून व कोरोना नियमावलीचे पालन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. यादव बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी नित्यसेवा मेडीकलचे प्रोप्रायटर सोहेल आतार यांनी आपल्या फर्मच्या वतीने उपस्थितांना मास्कचे वाटप केले. यावेळी ताई बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विशालभाऊ रोकडे यांनी बाबासाहेबांच्या जडणघडणीचा इतिहास सांगून त्यांचे कार्य देशबांधणीत कसे महत्त्वाचे होते हे सांगत बाबासाहेब हे 'आधुनिक भारताचे शिल्पकार' होते असे मत स्पष्ट केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अद्वितीय भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणाऱ्या सामाजिक भेदभावास नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे त्यांनी समर्थन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागरच आहेत असे मार्मिक विवेचन डॉ. संकेत यादव यांनी केले.
कार्यक्रमाप्रसंगी संतोष घोलप, संतोष गायकवाड, गणेश परंडवाल, सुफीयान आतार, संजय आवारी, मुजम्मील आतार, चांद शेख, स्वप्निल बोरुडे, सचिन जाधव, मुन्ना कन्हेरकर, विजय पंडीत, आशोक पंडीत, बाळासाहेब हिंगमिरे, अक्षय हिंगमिरे, प्रशांत पवार इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार पवन म्हस्कुले यांनी केले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद