जवळे / प्रतिनिधी: शिरीष शेलार : पारनेर तालुक्यातील जवळे येथील महादेव मंदिरात लगत सिद्धेश्वर ओढया मध्ये ग्रामपंचायतने खोदकाम करुन विहिरीचे बांधकाम केले आहे. या विहीरीची कोणतीही शासकीय परवानगी न घेता तसेच टेंडर न काढता हे खोदकाम व बांधकाम केल्याचा आरोप जवळे येथील रहिवासी असलेले भाऊसाहेब प्रकाश आढाव यांनी केला आहे. तसेच या संबधित कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीने खोदलेल्या विहिरी पासूनच पन्नास-साठ फुटावर गावातील सांडपाणी जात असल्याने आज नाही तरी भविष्यात त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो हा विचार त्यांनी यापूर्वीच करायला पाहिजे होता. तो केलेला नसल्याने ते पाणी पिण्यास योग्य नसल्याचा शासकीय अहवालही प्राप्त झालेला आहे. १५ सप्टेंबर २०२१ पासून विहिरी जवळच बेमुदत उपोषण करणार असल्याचे भाऊसाहेब आढाव यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. संबंधित निवेदनाची माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर, तहसीलदार पारनेर, सी ओ अहमदनगर, जवळे ग्रामपंचायत कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे.
अनेक वर्षापासून उन्हाळ्याच्या चार ते पाच महिन्यांमध्ये गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असते याबाबत ग्रामसभेत ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्याला अनुसरून तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या मासिक मिटिंगमध्ये कल्पना दिलेली असताना त्यानंतरच विहिरीचे हे काम केलेले आहे. त्यामुळे सदर झालेले काम हे एकाच रात्रीत झालेले नसून जवळपास दोन महिने काम सुरू होते. त्याकाळात एकाही ग्रामस्थांनी या कामाबाबत तक्रार न करता गावचा पिण्याचा पाणी प्रश्न सुटत आहे म्हणून समाधान व्यक्त केले होते. पण अचानक काय झाले त्यामुळे जवळे ग्रामस्थ भाऊसाहेब आढाव यांनी केलेल्या मागणीला योग्य ते आम्ही उत्तर देऊ.- सौ.अनिता सुभाष आढाव (जवळे ग्रामपंचायत सरपंच)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद