काव्यपुष्प साहीत्य पुरस्काराने संदिप राठोड यांचा सन्मान

0

निघोज / प्रतिनिधी - ग्रामीण कवी संदीप राठोड यांना नुकतेच काव्यपुष्प साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काव्यपुष्प साहित्य मंच मुंबई या संस्थेमार्फेत महाराष्ट्रातील साहित्यिक, सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखणीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना काव्यपुष्प साहित्य भूषण हा संस्थेचा सर्वोच्च पुरस्कार देवून गौरवीण्यात येत असते. पारनेर तालुक्यातील कवी संदीप राठोड यांच्या साहित्यिक तथा सामाजिक कार्याची दखल घेवून शिक्षक दिनाचे औचित्य साधत त्यांना राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाईन पध्दतीने पार पडला असून काव्यपुष्प साहित्य संस्थेचे प्रमुख श्री.भगतसिंग दंडवते, नरेंद्र पाटील, विलास पालवलकर, अशोक रजपूत यांच्या मार्फेत ऑनलाईन डिजिटल प्रमाणपत्र देवून संदीप राठोड यांना गौरवीण्यात आले. तसेच कोरोना प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर विशेष समारंभात त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

हे पण वाचा: विहिरी जवळच बेमुदत उपोषण करणार : भाऊसाहेब प्रकाश आढाव / काय आहे प्रकरण वाचा सविस्तर...



संदीप राठोड यांनी काव्यपुष्प साहित्य परिवाराचे आभार मानले. 
सदर पुरस्कार हा लेखनीला बळ देणारा तसेच आजवरच्या निष्ठेने लिखाण करत आलेल्या कवितेचा खरा सन्मान आहे.-संदीप राठोड

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top