शिवज्योतीचे निघोज मध्ये उत्साहात स्वागत.

1

पारनेर प्रतिनिधी सागर आतकर/महाराष्ट्र दर्शन न्युज:

पारनेर: शिवबा संघटनेच्या मावळ्यांनी शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ल्यावरुन दरवर्षीप्रमाणे पायी शिवज्योत निघोज येथे आणली. शिवज्योत आणण्यासाठी शिवबा संघटना कार्यकर्ते शुक्रवार दि. १८ रोजी रात्री किल्याकडे रवाना झाले होते. व शनिवार दि.१९ रोजी सकाळी ८ वाजता निघोज मध्ये ज्योतीचे आगमन झाले. यावेळी बसस्थानकावर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. शिवज्योतीचे स्वागत गावातून ढोल ताशांच्या सुरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंळगंगा देवीच्या मंदीराजवळ शिवज्योतीचे पुजन करण्यात आले. जय भवानी जय शिवाजी या घोषनांनी आसमंत निनादून गेला होता. यावेळी मंळगंगा पतसंस्थेचे संचालक रमेश वरखडे, अशोक ढवळे, संतोष रसाळ, शंकर पाटील वरखडे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त बबनराव ससाणे, विश्वास शेटे, पत्रकार भास्कर कवाद, शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद, एकनाथ शेटे, सुनील शेटे, रोहिदास लामखडे, भरत डोके, राजु लंके, मॅनेजर भुकन साहेब, रुपेश सरोदे आदिनी केले. त्याचप्रमाणे शिवज्योत आणण्यासाठी अनिल शेटे, शेखर लंके, राजु लाळगे, शैलेश ढवळे, निलेश वरखडे, निखिल वरखडे, निखिल लामखडे, नानु यादव, मंगेश ठानगे, शांताराम लामखडे, शैलेश लामखडे, सुजित लामखडे, रूपेश वरखडे, गोकुळ वाजे, कानिफ रसाळ, शुभम रसाळ, सोन्या वाघमारे, राहुल शेटे असे अनेक सहकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी या सर्वांचे आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

Google Ads 2




 

To Top