पारनेर तालुक्यातील निघोज येथे संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपसरपंच माऊली वरखडे, बाजार समितीचे माजी उपसभापती बबूशा वरखडे, शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
आजच्या युवा पिढीने संतांच्या कार्याचे अनुकरण करावे आपली धार्मिक संस्कृती जतन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी ग्रामसेवक वाळके भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ, काळूराम गजरे, अल्पसंख्यांक समाजाचे मार्गदर्शक अस्लम भाई इनामदार, दत्ता रसाळ, सुलतान सय्यद, नाभिक समाजाचे मनोहर राऊत, जितेंद्र राऊत, महादेव गजरे, भीमराव गजरे, कचरू गजरे, दत्तात्रय गाधडे, आनशा गजरे, चंद्रकांत गजरे, सत्यवान गजरे, राजू गजरे, अंकुश सोनवणे, अमोल गजरे, रवी जाधव, मनीष गजरे आदी उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद