ग्रामपंचायत मधील पदाधिकारी यांच्या निवडी योग्य असल्याचा नाशिक आयुक्तांनी दिला आदेश

0

निघोज / महाराष्ट्र दर्शन न्युज -

पारनेर तालुक्यातील निघोज ग्रामपंचायतील पदाधिकारी निवडी योग्य असल्याचा आदेश नाशिक आयुक्तांनी दिला आहे.

निघोज ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच ९ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेली निवड प्रक्रिया रद्द करावी, म्हणून ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांनी १५ मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला होता. त्या विवाद अर्जावर जिल्हाधिकारी यांनी ७ ऑक्टोबर रोजी संबंधित विवाद अर्ज हा वेळेत दाखल केलेला नाही. तसेच निवड प्रक्रिया ही ग्रामपंचायत अधिनियम ३५ (ब) प्रमाणे योग्य असून संबंधित विवाद अर्ज हा जिल्हाधिकार्‍यांनी फेटाळला होता.



परंतु जिल्हाधिकारी यांच्या निकालाच्या विरोधामध्ये लाळगे व कवाद यांनी अप्पर आयुक्त नाशिक यांच्याकडे २० ऑक्टोबर २०२१ रोजी अपील केले. जवळजवळ पाच महिने संबंधित प्रकरण नाशिक आयुक्तांसमोर चालू होते. कवाद व लाळगे यांच्या बाजूने अ‍ॅड. भगत यांनी बाजू मांडताना सबंधित प्रकरणांमध्ये दोन सदस्यांचे अपहरण झाले. त्या प्रकरणांमध्ये आरोप झालेल्यांना अटक करण्यात आली होती. जर माझे पक्षकार निवड प्रक्रियेमध्ये सहभागी असते तर सरपंच व उपसरपंच पदाचा निकाल वेगळा लागला असता असे अनेक मुद्दे मांडण्यात आले. 

वराळ गटाच्या बाजूने अ‍ॅड. संकेत ठाणगे यांनी बाजू मांडताना माझ्या पक्षकारांना खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवण्यात आले. त्यांनाच निवड प्रक्रियेपासून बाजूला ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. परंतु खेड न्यायालयाने तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन मंजूर करून माझ्या पक्षकारांना निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी दिली. सदर निवडप्रक्रिया ही ग्रामपंचायत अधिनियमाला धरून पार पडलेली आहे. सदर निवड प्रक्रियेमध्ये माझ्या पक्षकार चित्रा सचिन वराळ यांना नऊ मतदान तर समोरील सुधामती विठ्ठल कवाद यांस सहा मतदान झाले. माझ्या पक्षकार चित्रा सचिन वराळ ह्या बहुमताने सरपंच झाल्या. समोरील कवाद व लाळगे हे मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी जरी झाले असते तरी माझे पक्षकार चित्रा सचिन वराळ यांना कुठलाही फरक पडत नव्हता, असा युक्तीवाद करण्यात आला. 

दोन्ही बाजूंचे युक्तीवाद एकूण अप्पर आयुक्त नाशिक यांनी दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांचे अपील फेटाळून जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेश कायम ठेवला.

ज्यांना जनतेने नाकारले त्यांना मात्र हा कौल मान्य नव्हता. संबंधित निकाल हा जनतेने दिलेल्या कौलाच्या बाजूने लागल्याचे समाधान आहे. निघोज ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्पष्ट कौल हा संदीप पाटील वराळ जनसेवा पॅनलच्या बाजूने दिला होता. परंतु कौल त्यांना मान्य नव्हता.- चित्रा सचिन वराळ पाटील (सरपंच, निघोज ग्रामपंचायत)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top