जय मल्हार विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

0

पिंपळगावरोठा/महाराष्ट्र दर्शन न्युज: 

पारनेर: तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील जय मल्हार विद्यालय या विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आज संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग गायकवाड साहेब होते. तर व्याकरणाचार्य श्री. रंगनाथ सुंबे श्री. नृसिंह विद्यालय चास तर श्री रावसाहेब मारोती भोर सेना निवृत्त अननरी लेफ्टनंट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रथमतः या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री रंगदास सुंबे सर व श्री रावसाहेब भोर यांचा सत्कार ॲड. पांडुरंग गायकवाड साहेब यांच्या हस्ते करण्यात झाला. यानंतर विद्यालयाचा माजी विद्यार्थी व या शाळेचं रत्न विनायक दादाभाऊ सुंबरे हे युरोप खंडात इंग्लंड या देशात लंडन येथे कॉग्निझंट वर्ल्डवाइड  लिमिटेड या प्रायव्हेट कंपनी मध्ये टेक्नॉलॉजी लीड या पदावर जॉईन झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान केला गेला. याच गावातील प्रा. शैलेश शशिकांत जाधव याने गणित या विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून पीएचडी विद्यावाचास्पती ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदी पदवी मिळवली त्याबद्दल त्यांचा सन्मान केला गेला.    

इयत्ता ८,९ व १० वी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे भाषणे सादर केले. विद्यालयाचा माजी विद्यार्थी विनायक सुंबरे यांनी आपल्या भाषणांमधून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रेरणा जागृत केली. त्यांनी पुढे सांगितले की आपली मुले नेमकी कशा मध्ये कमी पडतात याचा शोध घेऊन त्यावर मात केली पाहिजे परीक्षेचे दडपण मनावर न घेता तिला सामोरे जा हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आपल्या ग्रामीण भागातील मुलांमध्ये ज्ञान असते पण ते मांडण्याची पद्धत नसते म्हणून ते कमी पडतात. असे सांगितले यानंतर प्रमुख पाहुणे श्री सुंबे सर यांनी व्याकरण सविस्तर समजावून सांगत असताना स्वतःचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला की मी आठवी नापास झालो होतो परंतु पुढे मात्र सलग तीन वर्ष वर्गामध्ये कसा पहिला नंबर मिळवला हे त्यांनी सांगितले तसेच अलीकडील काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण शक्ती कमी झालेली आहे ती वाढवली पाहिजे असे त्यांनी सांगितले.




अध्यक्षीय भाषणात ॲड. गायकवाड साहेब यांनी परीक्षेचे सेंटर आपली शाळाच आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठलेही दडपण न राहता त्यांनी परीक्षेला सामोरे जावे व विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लावावा, तसेच पटसंख्या वाढविण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले. त्यांनी खास करून आयान पठाण व कोमल जगताप या दोन दहावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. कोमल बद्दल बोलताना ते म्हणाले की तू खूप जीवनामध्ये मोठी होशील फक्त प्रयत्न कर तुझ्याकडे मराठी बोलण्याचे चांगले टेक्निक आहे तेव्हा तू नक्की जीवनामध्ये यशस्वी होईल असे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गर्कळ सर यांनी केले अनुमोदन श्री केदारी सर यांनी दिले व आभार श्री जरांगे सर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top