पिंपळगाव रोठा ते महाशिवरात्री महोत्सव संपन्न

0

पिंपळगाव रोठा प्रतिनिधी/ महाराष्ट्र दर्शन न्युज:

पारनेर:  तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील पुरातन देवस्थान श्री त्रंबकेश्वर महादेव देवस्थानात सालाबाद प्रमाणे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळी ७ वाजता श्री त्रंबकेश्वर महादेव मंदिरात अभिषेक, महापूजा श्री अच्युत भांबरे सौ सरिता भांगरे यांच्या हस्ते पार पडली. महाआरती होऊन शिवरात्री महोत्सवाला प्रारंभ झाला. हजारो भाविकांनी श्री त्रंबकेश्वर महादेव देवस्थानचे दर्शन घेतले. ग्रामस्थांनी फराळ महाप्रसादासाठी साबुदाणा, खिचडी, शेंगदाणे, तेल, मिरची, केळी, पत्रावळी, बिसलेरी बॉटल इत्यादी दानशूर ग्रामस्थांनी वस्तूरूप दान स्वरूपात मोठ्या प्रमाणात दिले. सन २००४ पासून कै. सौ.उल्हासाबाई विठ्ठल गायकवाड यांचे स्मरणार्थ कीर्तनसेवा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

यावेळी हभप श्री मनोहर महाराज सिनारे राहुरी यांच्या किर्तनाने सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यांनी महाशिवरात्री विशेष पर्वाची महती भावीक भक्तांना समजावून सांगितली. ते म्हणतात भगवान शिवाची आराधना जो करतो तो खरा वैष्णव आहे. महाराज पुढे म्हणतात मनुष्याने विकारापासून मुक्त व्हावे तेव्हाच त्याचा उद्धार होऊ शकतो. तसेच मनुष्याने साधना व साध्य विषयी एकनिष्ठ असावे. पिंपळगाव रोठा गावात झालेल्या महाशिवरात्रि उत्सवात हजारो ग्रामस्थ व भाविक भक्त महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन कीर्तन व महाप्रसादाचे लाभ घेतला. या कार्यक्रमाचे जय मल्हार विद्यालय, ग्रामपंचायत , भजनी मंडळे, ग्रामस्थ व मुंबईकर, तरुण मंडळे इत्यादींनी नियोजन केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top