चेन्नई सुपर किंग्सला मोठा फटका; ‘तो’ खेळाडू संघातून बाहेर!

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज | मुंबई :

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या स्पर्धेतील 38 वा सामना पंजाब किंग्ज विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Punjab Kings vs Chennai Super Kings) यांच्यात झाला. यात अवघ्या 11 धावांसाठी चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला आहे. दोन्ही टीमसाठी स्पर्धेचा फर्स्ट हाफ खास ठरला नाही. चेन्नईची अवस्था पण जवळपास मुंबई इंडियन्ससारखी झाली आहे.

सातत्याने पराभव स्वीकारावा लागणाऱ्या चेन्नईला आता अजून एक मोठा फटका बसला आहे. सीनियर खेळाडू मोईन अली (Moeen Ali) पुढील काही सामन्यांमध्ये संघाबाहेर असणार आहे. ‘सरावा दरम्यान मोईन अलीचा (Moeen Ali) घोटा मुरगळला आणि दुखापत झाली. नंतर एक्स-रेमध्ये फ्रॅक्चर नसल्याचे दिसून आले. परंतु बरे होण्यास वेळ लागेल’, अशी माहिती मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली आहे.

सोमवारी झालेल्या सामन्यातही चेन्नईच्या हाती निराशा लागली. मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नईला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 27 धावांची गरज होती. महेंद्रसिंह धोनीने चेन्नईला जिंकवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र तो अपयशी ठरला. आता टेबल पॉइंटमध्येही चेन्नई खाली आहे. या वर्षीचा आयपीएल सिझन खूपच चेन्नई आणि मुंबईच्या टीम्ससाठी विशेष खास ठरलेला नाही. मजबूत पकड आणि कायम विजय मिळवणाऱ्या या दोन्ही टीम्स यावर्षी खालून पहिला नंबर मिळवतील, अशी परिस्थिती आहे.

Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top