मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत घेतला ‘हा’ निर्णय..

0



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर आज आता मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी आज बैठीकीत औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत मोठी घोषणा केली आहे. मविआ सरकारने निश्चित केलेली नावे आम्हाला द्यायची आहेत, यात आमच्या सरकारचा कुठलाच वेगळा अजेंडा असण्याचं कारण नाही, असं ते म्हणाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या घोषणा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशीव असं करण्यात आलं आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. लवकरच ठराव करुन प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नामांतराचा महत्त्वाच्या निर्णयानंतर या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय झाला आहे. एमएमआरडीएला 60 हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे तसंच पहिल्या टप्प्यात 12 हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतलेल्या आजच्या बैठकीत मागच्या सरकारचे काही अनधिकृत असणारे निर्णय अधिकृतपणे घेण्यात आले. त्यानुसार शहरांच्या नामांतराचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मागच्या सरकारने घाईगडबडीत, अल्पमतात असताना देखील त्यांनी अनेक निर्णय घेतले होते. या निर्णयाला कुणी आव्हान दिले असते तर अडचणीचे ठरले असते म्हणून निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आता त्या निर्णयांचे प्रस्ताव पुन्हा एकदा सादर करायला सांगितले होते. त्यानुसार आम्ही निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) दिली आहे.


Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top