कविता म्हणजे समाज जागृतीचे माध्यम - कवी सागर काकडे

0

महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज /प्रतिनिधी सागर आतकर

कवीतेच्या माध्यमातून समाजजागृतीचे काम मोठ्या प्रमाणात होत असून आपली बोलीभाषा मराठी आहे. हा आपला अभिमान असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी सागर काकडे यांनी व्यक्त केले आहे. निघोज येथील श्री मलिका देवी महाविद्यालय मराठी विभागाच्या वतीने मराठी मराठी भाषा गौरव दिन कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी देवा झिंजाड, कवी सागर काकडे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर उपस्थित होते.

या गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी विभागाच्या वतीने काव्य संमेलनाचे आयोजन केले होते.

यावेळी प्राध्यापक वैशाली फंड यांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गीत सादर केले. 

कवी देवा झिंजाड म्हणाले की बोली भाषा संवर्धन हाच मराठीचा पाया आहे भाषा संवर्धनासाठी कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे असे सांगितले. तसेच  कवी देवा झिंजाड यांची टोपलीत माझ्या अर्धी भाकर असायची ही कविता सादर केली.

कवी सागर काकडे यांची काट्यानेच काटा काढू ही कविता सादर केली,कवी प्रवीण जाधव यांची कोळसा, कवी सुमित गुणवंत यांची घर म्हणजे चार भिंती नसतात,

कवयित्री वैशाली फंड यांची तुलाच मी साद देत आहे या कविता सादर करण्यात आल्या 

यावेळी कवी सागर काकडे यांनी मराठी भाषेला कला, साहित्य व सांस्कृतिचे योगदान आहे असे सांगितले 

यावेळी डॉ. सहदेव आहेर म्हणाले की मराठी असे आमची मायबोली आहे, मराठी भाषा दिन प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक कवी कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो मराठी भाषेला अधिक अधिक संपन्न करण्यासाठी व तिच्या समृद्धीसाठी ज्या साहित्यिक महात्म्यांनी आपले जीवन व्यतीत केले त्यांच्याबद्दल आपण ऋणी असली पाहिजे तसेच प्रत्येकाने मराठी भाषेतील साहित्याचा अभ्यास करून तिची कीर्ती जगामध्ये पसरवली पाहिजे असे सांगितले.जी भाषा बोलल्याने प्रेम प्रतिष्ठा आणि पैसा मिळतो ती भाषा समृद्ध होते, टिकून राहते. भाषा ही संवाद साधण्याचे व विचार करू शकण्यासाठीचे महत्त्वाचे साधन आहे आपल्या मनातील भावना आपली विचार आपण जितक्या चांगल्या पद्धतीने मातृभाषेतून व्यक्त करू शकतो तितक्या अन्य कोणत्याही भाषेतून नाही. वाचण करणारी माणसे मनाने विचाराने व  कृतीने श्रीमंत असतात. पुस्तकातून ज्ञान व ज्ञानातून  संपत्ती निर्माण होते म्हणून मराठी भाषेचा जागर करून तिचे संवर्धन करून तिला एकदा पुन्हा समाजामध्ये प्रतिष्ठित भाषेचा दर्जा मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी आपली सर्वांचीच आहे असे सांगितले. यावेळी महाविद्यालयातील ग्रंथालयातील पुस्तकांचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रास्ताविक व स्वागत मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक प्रवीण जाधव यांनी केले तर आभार प्राध्यापक सुमित गुणवंत यांनी मांडले सूत्रसंचालन प्राध्यापक नूतन गायकवाड यांनी केले. यावेळी  डॉ मनोहर एरंडे,प्रा. प्रविण जाधव, डॉ गोविंद देशमुख, प्रा.आनंद पाटेकर,  प्रा.मनीषा गाडीलकर,प्रा. पोपट सुंबरे, प्रा.सुमित गुणवंत, प्रा दुर्गा रायकर, प्रा. नूतन गायकवाड, प्रा. नीलिमा घुले, प्रा  स्वाती मोरे, प्राध्यापक दुर्गा रायकर प्रा. अपेक्षा लामखडे, प्रा. रुपाली गोरडे, प्रा. पूनम गंधात्त, प्रा. संदीप लंके, प्रा. नवनाथ घोगरे, डॉ. पोपट पठारे, प्रा. सचिन निघूट, प्रा. अक्षय अडसूळ, प्रा. संगीता मांडगे,प्रा. तुषार जगदाळे, प्रा. नीलिमा घुले, प्रा. अपेक्षा लामखडे, प्रा. वैशाली फंड,प्रा. संगीता मांडगे, प्रा. अमृता दौंडकर, प्रा. नम्रता थोरात, प्रा. प्रियंका लामखडे,प्रा. श्रद्धा ठुबे, प्रा. अशोक कवडे, प्राध्यापक संदीप लंके, श्री. नवनाथ घोगरे, श्री. अक्षय घेमुड, श्री. किशोर बाबर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top