महाराष्ट्र दर्शन न्यूज / शिरूर प्रतिनिधी
शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये माजी विद्यार्थ्यांचा पाचवा स्नेहबंध कार्यक्रम जल्लोषात व उत्साहात पार पडला. कित्येक वर्षांनी झालेल्या एकमेकांच्या भेटीने अनेक जण गहिवरून गेले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाद्य वाजवून तसेच पुष्प वर्षावाने करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून श्री प्रकाशशेठ धारीवाल (चेअरमन, माणिकचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज), श्री. मोहन आगलावे ( झोनल सेल्स मॅनेजर, ज्युबिलंट फार्मा), डॉ. श्री. राजेंद्रजी थिटे (अध्यक्ष, श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्था), डॉ. श्री द्वारकादास बाहेती (प्राचार्य, सिताबाई कॉलेज ऑफ फार्मसी), डॉ. श्री. अमोल शहा (प्राचार्य, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली),शिरूर एसटिसिओपियन्स अॅलुमनी
असोसियनचे पदाधिकारी श्री. बाबाजी गलांडे, श्री. उमेश छाजेड, श्री. अमित लुंकड, सौ. मिनाक्षी वाजे, श्री. ईश्वर सोनवणे, श्री आशिष मुथा, श्री. सोमनाथ साकोरे, सौ. मोनाली परभाणे, श्री. संदीप पोळ यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. प्रकाशशेठ धारीवाल यांनी माजी विद्यार्थ्यांना संबोधित करताना यशस्वी होण्यासाठी ध्येय, चिकाटी, परिश्रमा बरोबरच आई वडिलांच्या आशिर्वादाचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. स्व बापूसाहेब थिटे व स्व. रसिकशेठ धारीवाल जरी राजकीय पटलावर एकमेकांविरोधात राहीले असले तरी, कौटुंबिक निर्माण केलेला स्नेहाचा जिव्हाळा त्यांनी कायमस्वरूपी दुसऱ्या पिढीपर्यंत टिकवून ठेवला आहे. तसेच श्री मोहन आगलावे यांनी फार्मासुटीकल कंपनीच्या मार्केटिंग धोरनान बद्दल माहिती दिली, डॉ. श्री राजेंद्र थिटे यांनी कॉलेजच्या सुरू करण्यासाठी घेतलेल्या श्रमापासून ते आतापर्यंत झालेल्या सर्व जाडनघडणा विषयी सर्वांना अवगत केले. प्राचार्य डॉ. श्री. द्वारकादास बाहेती यांची जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच माजी विद्यार्थ्यांनी सढळ हातांनी आजी विद्यार्थ्यांना मदत करावी व आजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील रहावे अशा भावना व्यक्त केल्या. प्रा.डॉ श्री अमोल शहा यांनी माजी विद्यार्थ्यांनी कॉलेनच्या यशासाठी तसेच अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सहभाग वाढवण्याचे प्रतिपादन केले. तसेच विद्यार्थी आपल्या संघटनेमध्ये डी. फार्मसी व बी फार्मासिचे २७०० विदयार्थी असून सर्वांनी एकत्र येत नवीन व्यवसायाची पायाभरणी करावी असे आवाहन केले. शिरूर एसटियोओपियन्स अलुमिनि, असोशियनचे अध्यक्ष श्री बाबा गलांडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, या प्रसंगी कॉलेज मधील गुणवंत विद्यार्थ्यांना स्वर्गीय शशिकांत शहा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्काराने गौरविण्यात आले. या मेळाव्यात माजी विद्यार्थी महेश शिंदे यांनी आपल्या सुमधूर गाण्यांनी रंगत आणली तसेच सौ. स्वाती ठुबे यांनी कविता सादर केली व बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी स्वर्गीय डॉ. गणेशलालजी बाहेती यांचे स्मृतीप्रित्यर्थ डॉ. श्री.सोमनाथ साकोरे व डॉ श्री.अमित लुंकड यांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल "उत्कृष्ट माजी विद्यार्थी'' पुरस्काराने गौरविण्यात आले. या मेळाव्यात २५० माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. विजया पडवळ यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभारप्रदर्शन प्रा.अमित लुंकड यांनी केले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद