महाराष्ट्र दर्शन न्युज / पारनेर / प्रतिनिधी सागर आतकर
पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे श्री. संत निळोबाराय पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरी नाम सप्ताह व नाभिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्री. संत सेना महाराज मंदिर येथे बुधवार दिनांक २२ रोजी सायंकाळी ५ ते ६ यावेळेत ह.भ.प. बबन महाराज वाकचौरे यांचे प्रवचन झाले. तसेच सायंकाळी ६ ते ७ यावेळी दिंडीतील वारकरी व नाभिक समाज बांधवांनी हरिपाठ केला ह.भ.प. श्री. सोमनाथ महाराज राऊत यांचे किर्तन झाले झाले ह.भ.प.कै. दत्तात्रय महाराज राऊत वासुंन्दे यांचे स्मरणार्थ श्री राऊत बंधु वासुंन्दे यांनी अन्नदान केले. रात्री १२ ते ४ यावेळेत भजन संगीत व जागर हे नारायण गव्हाण येथील नाभिक भजनी मंडळ यांनी केले.
तर गुरुवार दिनांक २३ रोजी पहाटे ५ ते ६ यावेळी भजनी मंडळ व नाभिक परिवार यांनी काकडा आरती केली. या कार्यक्रमाची सांगता ही सकाळी ९ ते १२ यावेळी ह.भ.प. धनंजय महाराज उदावंत (वासुंदे) यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यानंतर दुपारी १२ ते २ कै. पार्वती व कै.ज्ञानदेव भोसले यांचे स्मरणार्थ श्री. सुदाम ज्ञानदेव भोसले यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. व सुरेश वाघमारे वाडेगव्हानवाडी यांनी या कार्यक्रमाच्या दोन्ही दिवशी आलेले वारकरी व समाज बांधवांसाठी चहा व नाश्त्याची सोय केली होती तसेच कार्यक्रमासाठी तेल डबा दिला. श्री संदीप वाघमारे यांनी फोटोग्राफी चे काम केले. यावेळी पत्रकार मित्र श्री. सागर आतकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. श्री. माऊली गायकवाड ( उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नाभिक महा.) श्री बाळासाहेब भुजबळ साहेब ( महाराष्ट्र नाभिक महामंडळ अहमदनगर ) श्री. जनार्दन राऊत राहुरी, मा .श्री विश्वनाथ कोरडे साहेब साडे अकरा वाजता कार्यक्रमाला भेट देऊन पुढील कार्यक्रमाला रवाना झाले. त्यानंतर आमदार निलेश लंके साहेबांचे बंधू दिपकशेठ लंके यांनी ही कार्यक्रम साठी शुभेच्छा दिल्या. श्री. अनिल निकम, संदीप वाघमारे, रमेश बिडवे, शाम जाधव, सोन्याबापू जाधव, श्री भाऊ सोनवणे, दत्तात्रय व धनंजय सोनवणे, सुनील आतकर, माऊली कोरडे, संजय वाकचौरे मेजर, श्री दादाभाऊ वाकचौरे गुरूजी, मुरली आतकर, गणेश खंडाळे, बाळा पंडित, मनोहर राऊत, नवनाथ राऊत, मेजर पांडुरंग राऊत, श्री मच्छिंद्र घायतडक, श्री भाऊ बिडे व शाम साळुंखे, राहुल काळे, प्रमोद सोनवणे, प्रसाद भोसले, रामेश्वर घायतडक, मच्छिंद्र वाघमारे, राम शिंदे व समस्त नाभिक बांधव या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन यात्रा कमिटी व समस्त पारनेर तालुका नाभिक समाज यांनी केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबनराव आतकर यांनी केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री संतोष घायतडक (कडे॔) यांनी केले तर आलेल्या सर्व मान्यवरांचे व सर्व देणगीदार यांचे आभार श्री स्वप्नील बिडे यांनी मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद