![]() |
विद्याधन शिक्षण संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते उपस्थीतांना मार्गदर्शन करताना. |
महाराष्ट्र दर्शन न्युज /निघोज /प्रतिनिधी सागर आतकर
शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांनी शिवव्याख्याते म्हणून जनमानसात शिवसंदेश देण्याचे महत्वपूर्ण योगदान दिले असल्याचे प्रतिपादन शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांनी व्यक्त केले आहे.
निघोज ता ता.पारनेर येथे विद्याधन शिक्षण संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाल विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य सांगुन उपस्थीतांची मने जिंकली. पंचवीस पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी छत्रपतींचा इतिहास सांगत उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुण शिरुर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बाराहाते हे बोलत होते.
यावेळी शिरुर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय बाराहते म्हणाले, शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद यांनी महाराष्ट्भर शिवव्याख्यानांमधुन आपले विचार मांडत असतानी तरुणांना प्रबोधनाचेही महत्त्वाचे कार्य पार पाडुन विद्याधन संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचे काम केले आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवनीतीचे तंत्र जोपासणे गरजेचे आहे. प्रा.कवाद यांनी शिवप्रबोधन व आचार विचार हे नक्कीच तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज बनली असल्याचे संजय बाराहाते यांनी आवर्जून सांगितले .
शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद यांनी सांगितले, १७ वर्षापासून विदयाधन संस्थेच्या माध्यमातून मुलांना ज्ञानदान करत असताना ज्ञानदानाबरोबर शिस्त व संस्काराला महत्त्व दिल्याचा सांगितले. घरातील एक विद्यार्थी घडला तर संपुर्ण कुटुंब सक्षम होते.
यावेळी पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, निघोज संस्था परिवाराचे अध्यक्ष वसंतराव कवाद, संदीप पाटील फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद आदींनी आपले मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी म्हणुन आमदार निलेश लंके साहेब यांचे पिताश्री गुरुवर्य ज्ञानदेव लंके, शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, कलाशिक्षक प्रा.ज्ञानेश्वर कवडे, डाॕ.विक्रम वराळ, पोस्टाचे वरिष्ठ अधिकारी अरुण रोकडे, दिलीप उनवणे व सर्व पोस्टातील अधिकारी व कर्मचारी, तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश लाळगे, भिमाजी शेटे गुरुजी, माजी पोलिसपाटील पांडुरंग लंके, चंद्रकांत उचाळे, सोसायटीचे चेअरमन सुनिल वराळ, माजी उपसभापती बबुशाअण्णा वरखडे, उदयोजक रामदास वरखडे, पारनेर तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लंके, मा.चेअरमन विठ्ठलराव बोदगे, कन्हैय्या पतसंस्थेचे व्यवस्थापक नारायण पवार साहेब, मळगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठलराव कवाद, काळभैरवनाथ दुध संस्था मावळेवाडीचे चेअरमन दत्तात्रय पठारे, उदयोजक मोहनराव कवाद, सुहास लंके, दिपक लंके, उदयोजक रोहिदास लामखडे, सामाजिक कार्यकर्ते रुपेश ढवण, विश्वस्त बबनराव ससाणे, मंगेशजी लंके, उदयोजक आप्पासाहेब वराळ, अरुणराव लंके, अशोकराव ढवळे, महेंद्र पांढरकर, रविंद्र पांढरकर, उदयोजक राजु वराळ, ह.भ.प.पवनमहाराज तनपुरे, पतसंस्थेचे संचालक सतिष साळवे,अस्लमभाई ईनामदार, मेजर संदिप कुदळे, विठ्ठलराव कोल्हे, बाळासाहेब लंके, बबनराव लंके, मयुर लंके, ज्ञानदेव वराळ आदी मान्यवर उपस्थितीत होते.
विद्याधन शिक्षण संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी प्रा.भरत डोके, प्रा.मंदा जाधव, प्रा.अपेक्षा लामखडे, प्रा.शिवाजी ढवळे, पत्रकार भास्कर कवाद व सर्व विद्यार्थ्यांनी अप्रतिम नियोजन केले. शेवटी महाप्रसादाच्या गोड कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पायल लोखंडे व तनुजा पांढरकर यांनी केले शेवटी सर्वांचे आभार पत्रकार भास्कर कवाद यांनी मानले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन काम करत असतानी पत्रकार बांधवांना समाजात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तरी पत्रकार आपले कार्य चालु ठेवतात. पत्रकार अडचणीत असतानी समाजाला पत्रकाराची आठवण होत नाही पण समाज अडचणीत असला की समाजाला पहिला पत्रकार आठवतो म्हणुन शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद यांनी यावेळी शिरुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बाराहाते पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे सहसचिव भास्करराव कवाद, उपाध्यक्ष संतोष ईधाटे, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव बाबाजी वाघमारे, सुरेश खोसे, योगेश खाडे, आनंदा भुकन, सागर आतकर, मंगेश पारखे, सचिन जाधव, विजय रासकर, संदीप गाडे, अविनाश भांबरे, संपत वैरागार आदी पत्रकारांचा विद्याधन संस्थेच्या वतीने सर्व पत्रकारांचा सन्मान करुन पत्रकारांचा समाजासाठी जो त्याग त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद