प्रियांका शेटे यांचा आदर्श घेवुन मुलांनी आपल्यातील जिद्दीने यशापर्यंत पोहचावे - डाॕ.सुनिल कदम

0



महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज / प्रतिनिधी - सागर आतकर

पारनेर तालुक्यातील निघोज येथील विद्याधन शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद सर यांनी आयोजित केलेल्या गुणवतांचा सन्मान या कार्यक्रमात अहमदनगर पुणे जिल्ह्यातील सुप्रसिध्द बालरोग तज्ञ डाॕ.सुनिल कदम हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रियंका यांनी लग्नानंतरही सासर व माहेर यांचा विश्वास संपादन करुन आपल्या जिद्दीने पोलिस उपनिरिक्षक पदी यशस्वी वाटचाल केली यापासुन विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी.

यावेळी पारनेर तालुका पावसाळी क्रिडा स्पर्धेत १७ वर्षीय वयोगटातील कबड्डी संघाने पारनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कबड्डी खेळाडू यासह खो-खो खेळाडु व  क्लासमधील ज्या विद्यार्थ्यांनी ज्ञानवर्धिनी, स्काॕलशिप व चित्रकला स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान, मुंबई सारख्या शहरातुन आपल्या मायभुमीमध्ये येवुन लहान मुलांचा दवाखाना चालु करुन लाखो पेशंटवर यशस्वी उपचार करणारे डाॕ.सुनिल कदम सर यांना लंडन आॕफ रेकाॕर्ड हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान, सौ.प्रियांकाताई शेटे यांची पोलिस उपनिरिक्षकपदी निवड झाल्याबद्दल सन्मान, अॕड. गणेश लाळगे साहेब यांनी मास्टर आॕफ लाॕ या पदवीमध्ये प्रावीण्य मिळविल्याबद्दल सन्मान तसेच निघोजचे सुपुत्र तुषार ढवण यांची केंद्रीय पोलिस उपनिरिक्षकपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी पारनेर तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लंके साहेब हे होते.

यावेळी वात्सल्य हाॕस्पिटलचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डाॕ.सुनिल कदम सर, पोलिस उपनिरिक्षक सौ. प्रियंका शेटे, अॕड. गणेश लाळगे, क्रिडाशिक्षक प्रा. महेबुब इनामदार सर यांनी आपल्या अनुभव विद्याधन कोचींग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना सांगितले. नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनामुळे भविष्यात या विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मोलाचे सहकार्य होणार आहे. 

जिल्हा स्तरावर निवड झालेल्या कबड्डी संघातील सत्यम कवाद, शिवा प्रजापती, हर्षद ढवळे, परवेज तांबोळी, अथर्व हारदे, करण गजरे, पारस इधाटे, पृथ्वीराज कोयटे, यश बेलोटे, श्रीकांत रसाळ, साहील रसाळ, दिक्षांत ढवण या खेळाडुंचा व विविध परिक्षांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्याधन संस्थेमधील विद्यार्थ्यांचा यावेळी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन न्यु आर्टस पारनेर काॕलेजच्या प्रा.पुष्पाताई घोगरे, कृषी सहाय्यक विठ्ठलराव बाबर, निघोजचे माजी पोलिस पाटील पांडुरंग लंके, मळगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राज्यस्तरीय कबड्डीपट्टु विठ्ठलराव कवाद, ग्रामपंचायत सदस्य गणेश कवाद, युवा उद्योजक निवृत्ती वरखडे साहेब, युवा उद्योजक विलास कवाद, क्रिडाशिक्षक प्रा.महेबुब इनामदार, प्रा.भास्कर काकडे, क्रिडा प्रशिक्षक सोमनाथ अनंत, ज्येष्ठ मार्गदर्शक विष्णुमामा लंके, साईराम ग्राफीक्सचे संचालक विकास लंके साहेब, साईराम अॕटो गॕरजेचे संचालक महेश रोकडे साहेब, बैलगाडा प्रेमी विजु बोदगे, पत्रकार बाबाजी वाघमारे, आनंद भुकन, पत्रकार भास्कर कवाद सर यासह आदी मान्यवर उपस्थितीत होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद सर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.भरत डोके सर व सर्वांचे आभार प्रा.अपेक्षा लामखडे व प्रा.एम.एस .जाधव यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top