श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

0



शिरूर / प्रतिनिधी- किरण चौधरी

         नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री.संत सेना महाराज यांची ६५३ वी पुण्यतिथी सोहळा शिरूर शहरातील रामलिंग रोड येथील शिक्षक कॉलनी येथे असणाऱ्या श्री.संत सेना महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सोमवार दि.११ रोजी श्री. संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त रामलिंग रोड शिक्षक काॅलनी येथील नाभिक समाजाचे श्री. संत सेना महाराज मंदिर परिसरात करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता. सकाळी अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. शुभांगी जाधव महाराज यांचे प्रवचन झाले. दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे, रामलिंगच्या सरपंच स्वाती घावटे, माजी नगरसेवक संदीप गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष विशाल घायतडक, तालुकाध्यक्ष अर्जुन शिंदे, महिला तालुकाध्यक्षा सुनीता देव्हाडे, समता परिषदेचे किरण बनकर, कुंभार समाजाचे तालुकाध्यक्ष योगेश जामदार आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरूर शहर नाभिक संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब क्षिरसागर, तालुका कार्याध्यक्ष गोरख गायकवाड, रणजीत गायकवाड, संतोष शिंदे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब गायकवाड, निलेश भोसले, संघटनेचे अध्यक्ष सनी थोरात, वैभव रायकर, प्रितेश फुलडाळे, संतोष गायकवाड, बबन वाघमारे, संतोष वाघमारे, सोमनाथ देव्हाडे, राजेंद्र कडुसकर, निलेश गायकवाड, अनिल रायकर यांसह सर्व नाभिक बांधवांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top