महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी -सचिन जाधव
पारनेर तालुक्यातील निघोज येथे मराठा समाजासाठी आरक्षण लागू करावे तसेच जालना जिल्ह्यात याच मागणीसाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी युवा नेते रुपेश ढवण यांनी मंगळवारपासून निघोज येथील ग्रामपंचायत समोर उपोषण सुरु केले होते.
अनेक दिवसापासून जरांगे पाटील हे मराठा आंदोलनासाठी संघर्ष करीत आहेत मात्र आद्यापही सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही हा मराठा समाजावर अन्याय आहे.- रुपेश ढवण
परंतु भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब लामखडे व भैरवनाथ पतसंस्थेचे मॅनेजर सोमनाथ वरखडे यांनी मध्यस्थी करून अखेर ढवण यांना पाणी देऊन उपोषण सोडवले. यावेळी संदीप वरखडे, प्रकाश वराळ, तुषार थोरात, सोहेल मोमीन, महेंद्र पठारे, शिवाजी शेटे, नवनाथ रसाळ, रामदास वाजे, विश्वास शेटे, सुपेकर सर, दिगंबर लाळगे, बाबु लाळगे, योगेश वाव्हळ, भरत रसाळ, संतोष शेटे, अशोक शेटे, दिनेश झावरे, अक्षय भाकरे, सोन्या भाकरे, मंगेश वराळ, शुभम निघोजकर, समाधान वरखडे, शांताराम कवाद, प्रवीण वराळ, संदीप ढवळे, महेंद्र पांढरकर, पत्रकार संदीप ईधाटे व सर्व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद