महाराष्ट्र दर्शन न्यूज / शिरूर / प्रतिनिधी किरण चौधरी
शिरूर शहरातुन जाणारा पाबळ फाटा ते मोतीनाला रस्त्याची दुरावस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम उपविभागाने तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा मनसेचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी दिला आहे.
शिरूर शहरातून ग्रामीण भागाकडे जाणारा पाबळ फाटा चौक ते मोतीनाला या रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे. दरम्यान या रस्त्याची दुरावस्था झाल्याने तेथील पदपथ अस्ति-त्वात राहिलेले नाही. यासोबतच रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्यांना खड्ड्यांबरोबरच वाहनांचा अंदाज घेऊन आपली वाटचाल करावी लागत असून. खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नामध्ये याठिकाणी अनेक अपघात देखील झालेले आहेत. प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. यामुळे तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा या विरुद्धात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे मा.शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी दिला आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद