शिरूर प्रतिनिधी - किरण चौधरी
शिरूर नगरपरिषदेच्या वतीने शहरात उचलण्यात येणारा कचरा हा 'प्रेरणा उद्यान' या ठिकाणी एकत्र डंप करण्यात येऊन त्याचा ढिग केले जातात. त्याच्या- वरती कोणत्याही शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला जात नाही. डंप केलेला कचरा नंतर पोकलेनच्या साहय्याने काढून रात्रीच्या अंधारामध्ये ग्रामीण भागामध्ये टाकल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. नुकताच डंप केलेला कचरा काढल्यामुळे गेल दोन दिवस त्या परिसरामध्ये दुर्गंधी सुटली आहे. त्याचा परिणाम कचरा डेपो शेजारील नागरी वस्तीवर होत असून त्या परिसरातील लोकांचे जीवन असह्य झाले आहे.
तरी आपण तात्काळ या बाबीं दखल घेऊन. घनकचराची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी अशी मागणी मनसेचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद